उमरगा (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची सदिच्छा भेट घेवून महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी चर्चा केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या फुटीनंतर जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांची एकत्रीत मोठ बांधत पक्षाला परत निष्ठावंत सहकार्यांच्या मदतीने उमरगा, लोहारा तालुक्यामध्ये मजबुत करण्याच्या दृष्टीकोणातून कॉंग्रेसचे जेष्ट नेते बसवराज पाटील यांची भेट घेतली. यावेळी बसवराज पाटील यांनी उमरगा व लोहारा तालु्नयात महाविकास आघाडी मजूबत करण्यासाठी ऊसाचा प्रश्न असो अथवा जागा वाटपाचा प्रश्न असो सर्वांना विश्वास घेवून काय करू असे स्पष्ट आश्वासन दिले.
अॅॅड.सयाजी शिंदे यांनी आपले विचार व्य्नत केले. प्रा.जगदीश सुरवसे यांनी प्रस्तावीक पर भाषण केले. तर प्रा.डॉ.शौकत पटेल यांनी उपस्थिताचे आभार मानले. यावेळी.प्रकाशजी आष्टे, प्राचार्य गरुडसर, राजेंद्र तळीखेडे, प्रताप तपसाळे, बाळु माशाळ, विजयकुमार थिटे, भैय्या शेख, प्रभाकर माने, धिरज बेळंबकर, सुभाष गायकवाड, मारुती पाटील, डॉ.सोमवंशी भागवत सोनवने यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.