धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय युवा दिवस प्रबोधन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक शल्य चिकित्सक डॉ. सचिन देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे होते. यावेळी ते डॉ. देशमुख म्हणाले की, एचआयव्ही हा एक गंभीर स्वरूपाचा विषाणू आहे. त्याची जनमानसात जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. यासाठी तरुण पिढीने पोस्टर आणि रिल्स तयार करून जागृती करावी. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, या तरुण पिढीने पुढच्या सुंदर आयुष्यासाठी आरोग्य निरोगी ठेवणे गरजेचे आहे.सामाजिक आरोग्य बिघडवणार्‍या घटनांपासून सावध राहणे गरजेचे आहे.आणि यासाठी सुशिक्षित आणि तरुण मुले प्रयत्न करू शकतात. एखादा आजार जडलेल्या व्यक्तीचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न देखील तरुण पिढीने करणे गरजेचे आहे असे ते यावेळी म्हणाले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. माधव उगिले यांनी केले.आभार प्रा. मोहन राठोड यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, प्रा.डॉ. मारुती लोंढे, प्रा. शरद लोंढे, प्रा. अतुल देशमुख आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. 

 
Top