धाराशिव (प्रतिनिधी)- एम .पी .एस.सी जाहिरात क्रमांक / प्रमाणे लेखी परीक्षा देऊन ,मुलाखत देऊन त्यात अव्वल स्थानी येऊन सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट -अ सरकारी वकील या पदावर ड.रत्नदीप मधुकरराव सोनवणे यांची एम .पी .एस .सी मार्फत निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ते डॉ. एम .बी. सोनवणे पशुसंवर्धन विभाग, निवृत्त व्यवस्थापकीय संचालक शेळी -मेंढी विकास महामंडळ ,महाराष्ट्र राज्य यांचे चिरंजीव आहेत .