धाराशिव (प्रतिनिधी)-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी धाराशिव)लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आ.अमित देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व जिल्हा प्रभारी माजी आ.विश्वनाथ चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक रविवार दि. 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता गांधी स्मृती भवन, जिल्हा कॉंग्रेस कमिटी कार्यालय, धाराशिव येथे आयोजित करण्यात आली आहे.

तरी  प्रदेश कॉंग्रेस पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी, तालुका, ब्लॉक, शहर, अध्यक्ष, पदाधिकारी, फ्रंटल, सेल, विभागाचे, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सभापती, सदस्य, नगरपंचायत, नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक, जि.प. गट प्रमुख व प.स.गण प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड धिरज आप्पासाहेब पाटील यांनी केले आहे.

 
Top