धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ना.हसन मुश्रीफ यांनी रविवारी (दि.27) धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावून इमारत बांधकामास सुरुवात करण्यात येईल अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या नूतन कार्यालय आणि मोठ्या उमेदीने बांधलेल्या संघटन कौशल्याचे कौतुकही त्यांनी केले.

यावेळी बोलताना मंत्री ना.मुश्रीफ यांनी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत आपण माहिती घेतली असल्याचे सांगून तातडीने जागा निश्चित करून बांधकामाला सुरुवात करण्यात येईल, असे सांगितले. धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात मंत्री ना.मुश्रीफ यांचे आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, शहराध्यक्ष सचिन तावडे यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी महिला तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुहास मेटे, सामाजिक न्याय विभागाचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.इंद्रजित शिंदे, तालुका उपाध्यक्ष बालाजी शिंदे, तालुका संघटक विवेक साळवे, आळणीचे सरपंच प्रमोद वीर, सुनील शेंडगे, असदखान पठाण, सचिन सरवदे, राजाभाऊ जानराव, विद्यार्थी आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सागर गुरव यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हेोते.


 
Top