परंडा (प्रतिनिधी) -धाराशिव जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व वाढले असून वरिष्ठ नेत्यांचेही विशेष लक्ष आपल्या जिल्ह्यावर आहे. त्यामुळे, धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात विशेष लक्ष देऊन पदाधिकाऱ्यांना जबाबदारी व कामाचे वाटप करण्यात येत आहे. परंडा तालुक्यातही पदाधिकारी निवडीसंदर्भात भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे बैठक पार पडली.  यावेळी, आगामी निवडणुकांच्या अनुषंगानेही चर्चा झाली. 

पुढील वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे, नगरपालिका, जिल्हा परिषदा, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निवडणुका पुढील काळात आहे. त्यामुळे, पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर सखोल आणि विशेष लक्ष देऊन काम होत आहे. परंडा तालुक्यातील पदाधिकारी निवडीही त्याअनुषंगानेच झाल्या आहेत.

या बैठकीला भाजपा जेष्ट नेते सुजितसिंह ठाकूर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, लोकसभा संयोजक नितिन जी काळे, ॲड. अनिल काळे, सुधीर आण्णा पाटील, नेताजी पाटील,  ॲड.जहीर चौधरी प्रदेश कार्यकारणी सदस्य, सतीश बाप्पा देशमुख, रामदास कोळगे, विनोद गपाट, शिवाजी गिड्डे, प्रवीण पाठक, इंद्रजीत देवकते, विकास कुलकर्णी, सुखदेव टोंपे, ॲड. गणेश खरसडे, ॲड. तानाजी वाघमारे, तानाजी पाटील, अनिल पाटील, हनुमंत पाटील तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल तिपाले यांनी केले तर मान्यवरांचे आभार निशीकांत क्षिरसागर यांनी मानले. 


 
Top