धाराशिव (प्रतिनिधी) - स्टेट बँक ऑफ इंडिया क्षत्रिय का व्यवसाय कार्यालय क्षत्रिय व्यवसाय कार्यालयधाराशिव व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान धाराशिव यांच्याद्वारे नियोजन भवन धाराशिव येथे बचत गट कर्ज वितरण मेळावा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील 349 बचत गटांना दहा करोड रुपये कर्ज मंजुरीचे पत्र स्टेट बँक ऑफ इंडिया प्रशासकीय कार्यालय नांदेड उपमहाव्यवस्थापक प्रियकुमार सरीगला यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी उस्मानाबाद क्षत्रिय व्यवसाय कार्यालयाचे सहाय्यक महाव्यवस्थापक  

नरसिंगकुमार मेहता एसबीआय नांदेडचे मुख्य व्यवस्थापक शशिकांत फरकाडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एसबीआय क्षत्रिय  व्यवसाय कार्यालयाचे मुख्य प्रबंधक बी शंकर प्रवीण डोंगरे जिल्ह्यातील सगळ्या एसबीआय शाखेतील व्यवस्थापक यांचे मोलाचे योगदान लाभले.


 
Top