धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला 34 वर्ष पूर्ण केल्याबद्दल व ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने हुतात्मा स्मारक येथे धाराशिव अंनिसच्या वतीने शपथ घेऊन व हुतात्म्यांना अभिवादन करून साजरा करण्यात आले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष अजय वाघाळे, प्रधान सचिव वामन पांडगळे ,शहराध्यक्ष सिद्धेश्वर बेलुरे, सोमनाथ बेलुरे पत्रकार नवाब मलिक मोमीन, बाजीराव पांचाळ, पोपट रणखांब, जालिंदर पांचाळ, सुधाकर जमदाडे व इतर उपस्थित होते.