तेर (प्रतिनिधी) - अधिक श्रावण मासानिमीत्त धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिर व कालेश्वर मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला.
या सप्ताहात ह.भ.प.अनिल महाराज पाटील,ह.भ.प.सागर महाराज राडे,ह.भ.प.जयराम महाराज सूपेकर,ह.भ.प.भगवान महाराज शिंदे,ह.भ.प.आधार महाराज कुमावत,ह.भ.प.अमोल महाराज शास्त्री,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज लिपणे यांची किर्तने झाली तर काल्याचे किर्तन ह.भ.प.कृष्णा महाराज सागावकर यांचे झाले.यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.