तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील अंगणवाडी क्रमांक 212 मध्ये चार दिवसांत दोनदा नागराज आढळल्याने भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर येथील विश्रामगृहातच्या पाठीमागे अंगणवाडी क्रमांक 212 अंगणवाडी आहे.या अंगणवाडीत लहान बालके शिक्षण घेतात.परंतू याच अंगणवाडीत 28 जुलैला मोठा नाग निघाला.तो अंगणवाडीतून बाहेर गेला. तर 31 जुलैला याच अंगणवाडीत अंगणवाडीतील भांड्यावर परत एकदा नागराज दिसले.परंतू यावेळी नागराजला मारण्यात आले.चार दिवसात दोनदा अंगणवाडीत नागराज आढळल्याने बालकासह नागरीकांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.अंगणवाडीच्या कडेला घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याबाबत अंगणवाडी कार्यकर्ती सरोजा वाघमारे यांनी तेर ग्रामपंचायतकडे अंगणवाडीतील उखडलेली फरशी दुरूस्त करावी व अंगणवाडी समोर मुरूम टाकण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.तेर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाचे विस्तार अधिकारी वळसे यांनी अंगणवाडीस भेट देऊन पाहणी केली.