धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तर ज्युनिअर गट (14,16,18,20 वर्षाखालील मुले/मुली) स्पर्धेसाठी धाराशिव ज़िल्हा ॲथलेटिक्स संघटना व श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची अजिंक्य पद स्पर्धा व निवड चाचणी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव येथे दि. 2 व 3 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी  9:00 वा. आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये 60 मी,100 मी ,200 मी, 400 मी ,600 मी,800 मी,1500 मी,5000 मी, गोळा फेक, लांब उडी ,उंच उडी, थाळी फेक ,भाला फेक,अडथळा,स्टिपलचेस, 4100मी रिले,4400मी रिले व इत्यादी या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेमधून प्रत्येकी 2 विजयी खेळाडू  मुले व मुलींची निवड धाराशिव(उस्मानाबाद) जिल्हा संघात केली जाणार आहे.खेळाडूंनी सोबत आधार कार्ड ,जल्म दाखला(नगरपालिका/ग्रामपंचायत), 2 पासपोर्ट साइज फोटो,10 वी प्रमाणपत्र (सनद), AFI UID  नंबर सोबत आणावे.यासाठी राजू सोलनकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून सुरेंद्र वाले, मुनीर शेख ,माऊली भुतेकर,अजिक्य वराळे यांची,तर राजेश बिलकुले यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती निवड करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून सचिन पाटील,रोहित सुरवसे,प्रशांत बोराडे,ऋषीकेश काळे,रविराज घाडगे,अश्विन पवार,हरी खोटे,सुरज ढेरे,योगिनी साळुंखे हे आहेत.स्पर्धा प्रमुख म्हणून श्री संजय कोथळीकर यांची निवड करण्यात आली आहे. यास्पर्धेत अधिकाधिक खेळाडुनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा भरत जगताप  व सचिव योगेश थोरबोले यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी योगेश थोरबोले (9860609056), रोहित सुरवसे(7796756866)यांच्याशी संपर्क साधावा.


 
Top