धाराशिव  (प्रतिनिधी) - भूम आणि वाशी या तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे.दुग्ध आणि पशुपालन हा येथील मोठा व्यवसाय आहे.तेरखेडा हा मराठवाड्यात दिवाळी साजरी करण्यासाठी फटाके आणि इतर बारूद साहित्यांसाठी प्रसिध्द आहे.या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.अशी ग्वाही पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे 25/15 अंतर्गत मंजूर मुस्लीम कब्रस्थानचे भुमीपूजन.आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत मंजूर रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन आणि पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते 5 कोटी 60 लाख निधीच्या बहुला ईट्कुर ते तेरखेडा कडकनाथवाडी या 18 कि.मी लांबीच्या रस्त्याचे भूमीपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top