धाराशिव (प्रतिनिधी) -  शहरातील बार्शी नाका येथील लहुजी प्रतिष्ठानच्यावतीने विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठ्या उत्साहात दि. ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली.

धाराशिव शहरातील बार्शी नाका जिजाऊ चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीचे पूजन पोलीस उपअधीक्षक राठोड, आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, पांडुरंग लाटे, अभिजीत पतंगे, वैभव नायकल, राजसिंह राजेनिंबाळकर, नितीन काळे, यांच्या हस्ते करण्यात आले. तर समाजातील गरजू कुटुंबाला किराणा साहित्याची मदत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच जिजाऊ चौक बार्शी नाका ते आर पी कॉलेजपर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली. तर घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच सायंकाळी  वाजता जिजाऊ चौक ते क्रांती पिता लहुजी साळवे वस्ताद चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक काकासाहेब पेठे, रवींद्र झोंबाडे, सुधीर शहापालक, सचिन पेठे, श्रीकांत लोकरे, विजय आडगळे, सुरज मगर, सुरज शहापालक, विजय देडे, अजय देडे, मुकेश शहापालक, किरण झोंबाडे, गणेश मगर, सचिन शहापालक आदींसह लहुजी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांचे परिश्रम घेतले.


 
Top