धाराशिव (प्रतिनिधी) येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 24 जुलै 2023 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सप्ताह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. या सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आणि गुरुदेव कार्यकर्त्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धा,निबंध लेखन स्पर्धा, पत्रकार आणि संपादक यांच्याशी संवाद,तज्ञ लोकांच्या मुलाखती व व्याख्याने इत्यादी अनेक उपक्रम घेऊन सप्ताह साजरा करण्यात आला.

आज या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सप्ताहाची महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सांगता समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभागाचे प्रमुख प्रा.निल नागभिडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विद्या देशमुख व प्रमुख उपस्थिती प्रा.श्रीराम नागरगोजे हे होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ. जीवन पवार यांनी केले. आभार प्रा.बालाजी कर्‍हाडे यांनी मानले तर सुत्रसंचलन डॉ. साखरे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी सर्व गुरुदेव कार्येकर्ते व मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपन्न झाला.


 
Top