तुळजापूर (प्रतिनिधी)-करियर 360 माहेश्वरी यांच्याद्वारे भारतातील आय एस, सीबीएससी स्कूल ,रेल्वे स्कूल यांच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक उत्कृष्टता गुणवत्ता, व दर्जेदार स्टाफ विद्यालयातील सोयी, सुविधा विद्यार्थ्यांची घेतली जाणारी काळजी. निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांना दिली जाणारी सुविधा अशा निकषांवर केलेल्या सर्वेमध्ये देश स्तरावर जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद शाळेतील वर्ष 22-23 मध्ये राष्ट्रीय पातळीवरील सीबीएससी परीक्षेत दिलेली यश, 35 नॅशनल टॉपर्स, विभागीय स्तरावर 3 स्थान, देशात दहावी परीक्षेत 9 स्थान, विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी मिळवलेली यश शाळेचा वंदे भारत ट्रेन राष्ट्रीय उपक्रमात सहभाग, एक भारत श्रेष्ठ भारत मध्ये ओडिसा राज्यसफर, राष्ट्रीय कला उत्सव मध्ये निवड, खेळात राष्ट्रीय पातळीवर सहभाग अशा अनेक विक्रमामुळे इंडियन बेस्ट स्कूल अवार्ड राष्ट्रीय पुरस्कार बहुमान झाला आहे. शाळेच्या या यशाची कीर्तीचे, अभिनंदन नवोदय विद्यालय समिती, पुणे. विभाग आयुक्त वेंकटेश्वर सर सहाय्यक आयुक्त श्री सावंत सर उस्मानाबादचे कलेक्टर व शाळेचे चेअरमन डॉ. सचिन ओंबासे, प्राचार्य श्री गंगाराम सिंह ,पालक वर्ग स्थानिक याद्वारे सर्वाकडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.