उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील शेतकर्‍यांना महसूल सप्ताहाच्या निमित्ताने विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तलाठ्यांची भूमिका महत्वाची असून या सप्ताहात जाणीवपूर्वक काम करून महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले.

उमरगा तहसील कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (दि. 4 ऑगस्ट) रोजी महसूल सप्ताहाअंतर्गत घेण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार गोविंद येरमे हे होते.

पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की नागरिकांच्या लाभासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत त्यात सलोखा योजना,शेतरस्ते अतिक्रमणमुक्त,फेरफार अदालत,महसुल अदालत,विविध शासकीय योजनेची माहिती कथन केली.

यावेळी संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले. नवीन शिधा पत्रिका व दुय्यम शिधा पत्रिकेचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. तर जातीचे प्रमाणपञ, फेरफार अदालतीत निकाली काढलेले फेरफार नक्कल, सातबारा, आठ अ, सलोखा योजनेतील लाभार्थ्यांना पंचनामा नोंदवहीतील वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्तावित तहसिल गोविंद येरमे यांनी केले. कार्यक्रमास नायब तहसिलदार राजाराम केलुरकर, रतन काजळे, शिवाजी फाळेगावकर पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन गजानन नरवडे, के.के.कुलकर्णी, मंडळ अधिकारी सुहास जेवळीकर, दीपक चव्हाण, मनोज यमुलवाड, सरवर सय्यद, महादेव आमले, संदीपान माचन्ना, प्रविण कोकणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुञसंचलन मंडळ अधिकारी सुहास जेवळीकर यांनी केले. तर दीपक चव्हाण यांनी आभार मानले.


 
Top