तुळजापूर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पावन रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान सुरू केले होते. त्यांचा सांगता समारंभ तुळजापूर येथे करण्यात आला. यावेळी शेतकर्यांच्या प्रश्नाना न्याय देण्याची सरकारला सुबुद्धी दे असे साकडे घालत असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील यांनी केले.
धाराशिव जिल्ह्यातही जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कालभैरवनाथ सोनारी ते श्रीक्षेत्र तुळजापूर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान राबविले. धाराशिव जिल्ह्यात 28 जुलै पासून सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानची शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी कुलस्वामिनी जगदंबेच्या दरबारात तुळजापूर येथे महाद्वारसमोर सांगता झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उच्चाधिकार समितीचे प्रकाश पोपळे, युवती महिला आघाडीच्या अध्यक्ष पूजा मोरे, गजानन बंगाळे पाटील, प्रा.डॉ.बिभीषण भैरट, गोरख भोरे, राजाभाऊ हाके, भोजने, नेताजी जमदाडे, जनार्दन पाटील, प्रशांत डिक्कर, धाराशिव जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, धनाजी पेंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी जिल्ह्यात अभियानच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात केलेल्या जनजागृतीच्या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी आपले विचार व्यक्त केले. अभियानच्या समारोपप्रसंगी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत समुद्रे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रबोधनपर गीतांमधून शेतकर्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या.