धाराशिव (प्रतिनिधी)-देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे मेरा देश, मेरी मिठ्ठी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याील प्रत्येक गावातील माती दिल्ली येथे नेली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे यांनी दिली. 

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले उपस्थित होते. यावेळी झेडपी सीईओ प्रांजल शिंदे आणि सांगितले की, 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान कोणत्याही एका दिवशी पाच उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर घेतले जाणार आहेत. यामध्ये शिलालेख तयार केला जाणार असून, गावातील एका ठिकाणी शिलाफलकाचची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो, पंतप्रधानांचा 2047 च्या व्हिजन संदर्भातील संदेश, गावातील शहिदांची नावे असणार आहेत. तसेच वसुधा वंदना उपक्रमांतर्गत 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका साकारण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्यसैनिक व वीरांना वंदन करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.


पुन्हा हर घर तिरंगा

जिल्ह्यात पुन्हा हर घर तिरंगा अभियान गतवर्षीप्रमाणे राबवण्यात येणार आहे. यासाठी टपाल कार्यालयसात ध्वज उलपब्ध करण्यात येणार असून, ग्रामपंचायतींकडून याची मागणी नोंदवून घेण्यात येणार असल्याचेही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे यांनी सांगितले.


 
Top