धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 8 वे महाअधिवेशन 7 ऑगस्ट 2023 ला मंडल आयोग दिनानिमित्त श्री वेंकटेश्वरा युनिव्हर्सिटी स्टेडियम तिरूपती येथे होत असून, या अधिवेशनास महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले यांनी केले आहे.
या महाअधिववेशनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता आंध्रप्रदेश मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी करणार असून, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकारचे हंसराज अहिर, आंधप्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी, चेलूवोईना वेणुगोपाल कृष्णा, गणगुला कमलाकर, श्रीमती के. व्ही. उपाश्री, नानभाऊ पटोले, चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, महादेवराव जानकर, डॉ. परिणय फुके, आ. अॅड. अभिजीत वंजारी, आ. सुधाकरराव अडवाले, आ.जंगा कृष्णमुर्ती, माजी आ. डॉ. अविनाश वारजुरकर हे उपस्थित राहणार असून, या प्रसंगी आंध्रप्रदेश बीसी वेल्फेयर असो. चे अध्यक्ष केशन शंकरराव हे स्वागत पर भाषण करणार आहेत.