तुळजापूर (प्रतिनिधी)- हिंदू धर्मियांन मध्ये अधिक श्रावणात देवदर्शन करणे पुण्याचे मानले जाते. आगामी निवडणुकांचा पार्श्वभूमीवर राज्यातील लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद मधील इच्छुक आपआपल्या मतदार संघातील महिला मतदारांना अधिकश्रावण मासात देवदर्शन घडवत आहेत. त्यामुळे तिर्थक्षेञ तुळजापूर महिलांनी रोज गजबजुन जात आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूर व श्रीक्षेञ तुळजापूर या धार्मिक स्थळांचे देवदर्शन करण्यासाठी महिलांची तीर्थयात्रा देवदर्शन उपक्रम सध्या सुरु आहे. सध्या राज्यातील विविध भागातुन दररोज तीन ते चार हजार महिला वर्ग गळ्यात ओळखपञ घातलेल्या महिलांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. सदरील महिलांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या कि, आम्ही प्रथमता तिर्थक्षेञ पंढरपूरला जावुन चंद्रभागात स्नान करतो नंतर देवदर्शन करुन तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन श्री कल्लोळ गोमुख तिर्थकुंडात स्नान करुन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावी जातो.
सध्या वाहन तळात दररोज सकाळी पन्नास ते साठ बसेस दिसत आहेत. त्यावर नंबर टाकलेले आहेत, शक्तीपीठ व भक्ती पीठचे दर्शन अधिक महिन्यात घडत असल्याने महिला वर्गातुन आनंद व्यक्त होत आहे.
तिर्थक्षेञ देव दर्शन सोहळ्याचा लाभ इछुकांना किती होणार हे मतमोजणी प्रक्रिया पार पाडल्यानंतरच कळणार आहे. यामुळे सध्या तरीमहिलांना माञ अधिकश्रावण मासातील देवदर्शनचे पुण्य लाभत आहे.या महिला भाविकांचा ओघ श्रावण संपेपर्यत राहण्याची शक्यता आहे.