धाराशिव (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा 9 ऑगस्ट 2023 पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात मेरी माटी मेरा देश हा उपक्रम केंद्र शासनाच्या सूचनेनुसार साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पंचप्राण शपथ हा कार्यक्रम येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज सकाळी 10.00 वाजता घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांना पंचप्राण शपथ दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर, उपजिल्हाधिकारी मांजरा प्रकल्प भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे तसेच महसूलचे तहसीलदार प्रवीण पांडे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय कुलकर्णी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top