धाराशिव (प्रतिनिधी)-तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा सैनिकी हायस्कूल तुळजापूर  येथे पार पडल्या त्यावेळी एकलव्य विद्या संकुल मंगरूळ यमगरवाडी ता. तुळजापूर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश  संपादन केले. 

 त्यामध्ये 14 वर्ष वयोगट मधील खेळाडूंनी अतिशय चुरशीच्या सामन्यात मुलांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.  एकलव्यच्या खेळाडूंनी कबड्डी मध्ये चांगली कामगिरी केली. या सर्व खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर भुतेकर, कबड्डी क्रीडा प्रशिक्षक यशवंत निंबाळकर, बालाजी क्षीरसागर यांचे संस्थेच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वैदू, कार्यवाह विवेक आयचीत, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे, संस्थेचे संचालक अशोक संलेचा, सतीश कोळगे व सर्व संचालक मंडळ व क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी  अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top