धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,उस्मानाबाद संचलित के .टी .पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय व वाणिज्य महाविद्यालयात, गुरुवर्य के.टी पाटील यांच्या जयंती निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली.

महाराष्ट्र ज्ञान मंडळ मर्यादित (एमकेसीएल) संस्था व के.टी. पाटील संगणक शास्त्र महाविद्यालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत ची प्रायोजक असलेली ही संस्था महाराष्ट्रातील 9 प्रमुख विद्यापीठे, शिक्षण संस्था व काही सामाजिक संस्था यांच्या सहयोगातून स्थापन झाली आहे.

सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययन, अध्यापन व शैक्षणिक व्यवस्थापन क्षेत्रात ही संस्था गेली 21 वर्षे कार्यरत आहे.

तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी New Age Technology – Cyber Security – Aptitude” वर आधारित  Megatrends , ChatGPT , Artificial intelligence ,Big Data , Machine Learningअश्या अत्याधुनिक विषयावर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या प्रश्नावर आधारीत परीक्षा द्यावी असा उपक्रम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविला गेला.

सदर परीक्षा यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. अजित मसलेकर सर, श्री.कुलकर्णी सर, प्राध्यापक शुभम पाटील, मुंढे सर, सौं. गवळी मॅडम सर व कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले तसेच अण्णा इन्फोटेक चे चेअरमन आदित्य पाटील महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल)  उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रमुख श्री धनंजय जेवळीकर सर,संतोष बनसोडे सर व हणमंत इंगळे सर यांनी मार्गदर्शन केले.


 
Top