तुळजापूर (प्रतिनिधी)-तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात नागपंचमी सण पारंपारिक पध्दतीने नागदेवतेचे मनोभावे पूजन करून दूध, लाह्या पुरणपोळी  नैवेद्य दाखवुन व माहेरवाशीनीने झोके खेळुन  साजरा करण्यात आला.            

श्री तुळजाभवानी मंदिरात देविजींचे चरणतिर्थ झाल्यानंतर होमकुंड समोर पितळी नागदेवतेची प्रतिष्ठापना विधीवत करण्यात आली.या नागदेवतेचे पुजन .सुवासनी यांनी केले तर भक्तांसह शहरवासियांनी याचा दर्शनार्थ गर्दी केली होती. मुली, महिलांनी शहरात नगरसेवक सुनिल रोचकरी यांनी विविध ठिकाणी बांधलेले झोके खेळुन नागपंमी साजरी केली.                                                  

सांयकाळी श्रीतुळजाभवानी मंदीरात प्रथम श्रीतुळजाभवानी मातेचे नंतर होमकुंडा समोरील नागदेवतेचे दर्शन करुन  सांयकाळी  पाच ते सहा या कालावधीत  फेर धरुन फुगड्या खेळुन नागपंचमी साजरी महिला वर्गाने मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला होता. शहरासह ग्रामीण भागात नागदेवता मंदीरात महिलांनी नागदेवतेचे पुजन  करुन गोडधोड खावुन नागपंचमी सण साजरा केला.


 
Top