धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी जिल्हा धाराशिवच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात पावसामध्ये तीन आठवड्या पेक्षा अधिकचा खंड झाल्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. पावसाच्या ओढीमुळे शेतकरी चिंतातुर असून पिके सुकू लागली आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या शासन निर्णयाप्रमाणे पावसातील खंडामुळे उत्पादनात 50 टक्क्याहून अधिक घट दिसून येत असल्यास 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागात आजवर अत्यल्प पाऊस झाला असून तीन आठवड्यापेक्षा अधिकच्या खंडामुळे शेतकऱ्यांना 25% अग्रिम नुकसान भरपाई मिळणे अभिप्रेत आहे. खरिपाची पिके नगदी उत्पन्न देणारी असल्यामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मुख्यतः याच पिकांवर  अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकांच्या नुकसानीपोटी तात्काळ मदत मिळावी म्हणुन आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माजी आ सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आज पिक विमाच्या संदर्भात जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या पार्श्वभुमीवर जिल्हयातील शेतक-यांना दिलासा मिळावा व साहय मिळावे हया अनुषंगाने भाजपा व शेतक-यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, रेवणसिध्द लामतुरे, सुनिल काकडे, सरचिटणीस प्रदीप शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, मा.उपनगराध्यक्ष अभय इंगळे, संजय लोखंडे, पांडुरंग लाटे, विनोद निंबाळकर, संदीप इंगळे, अमोल राजेनिंबाळकर, उपसभापती शेषेराव चव्हाण, देवा नायकल, गणेश मोरे, विनायक कुलकर्णी, मुदाड पठान, बालाजी नांदे, अतुल चव्हाण, किशोर पवार, प्रविन सिरसाठे, नानासाहेब कदम, नरेंद्र वाघमारे, शेषेराव उंबरे, रोहित देशमुख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.


 
Top