तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांनी (महाराष्ट्र शासनाने प्राधिकरण स्थापन करुन दिलेला निधी) बांधलेल्या  घाटशिळ रोडवरील   भक्त निवासच्या  इमारतीच्या संपुर्ण भिंती मध्ये  पाणी  मुरत  असुन सदर इमारत धोकादायक असल्याने  वापरुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी रविंद्र साळुंके यांनी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर  संस्थान अध्यक्ष यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांनी (महाराष्ट्र शासनाने

प्राधिकरण स्थापन करुन दिलेला निधी) बांधलेल्या 108 भक्त निवासचे इमारतीचे संपुर्ण बांधकाम  निकृष्ट दर्जाचे  केल्याने  इमारतीच्या संपुर्ण भिंती मध्ये  पावसाचे पाणी मुरत असुन, सदर इमारतीच्या भिंती या पुर्णपने ओल्या झाल्याचे निदर्शनास येत आहे. सदर इमारत ही निवासासाठी  धोकादायक असल्याने कोणत्याही क्षणी भाविकांच्या जिवीतास धोका होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. या तळमजल्यात लिकेजचे पाणी येत आहे. केलेले फर्निचर खराब होत, खोल्या मधील पडदी भिंतीला पाणी मुरत आहे. तरी आपण याबाबत स्वत: सदर इमारतीची पाहाणी करुन योग्य तो निर्णय घेवुन तसेच योग्य ती उपाय योजना करुन होणारा अनर्थ टाळावा. सदर इमारतीमध्ये असलेली अग्निशामक यंत्रना ही तकलादु आहे. तरी उच्च दर्जाची व मजबुत स्वरुपाची अग्निशामक यंत्रना बसविण्यात यावी, व दिव्यांग व्यक्तीसाठी सदर इमारतीमध्ये लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

 
Top