धाराशिव (प्रतिनिधी)- पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते आज 8 ऑगस्ट रोजी परंडा तालुक्यातील कंडारी येथे 10 कोटी 38 लक्ष 50 हजार रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनंजय सावंत, दत्ताअण्णा साळुंखे, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे, उपविभागीय अधिकारी वैशाली शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही डी.कुलकर्णी, समुदाय आरोग्य अधिकारी रूपाली शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले, नागरिकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे पालकमंत्र्यांनी सांगितले.