धाराशिव (प्रतिनिधी)-लोकशाहीर व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मसला ता. तुळजापूर जि.धाराशिव येथे दि. 1 ऑगस्ट रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.
मंगळवार दिनांक 01 ऑगस्ट रोजी मसला (खु) ता. तुळजापूर जि.धाराशिव येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 690 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 70 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीरात प्रमुख पाहुणे सरपंच रामेश्वर वैद्य, ग्रा.प सचिन कंदले, ग्रा.प सदस्य दयानंद शिंदे, डिंगबर कदम, लक्षमण वडवराव, नवनाथ कदम, सुनिल घोडके, धनाजी येडोळे, प्रशांत शिंदे, अगन नरवडे, अभिषेक शिंदे, अमिर काझी, राजेंद्र शेडगे, गणेश शेंडगे, विकास वडवराव, धनाजी वडवराव, सुग्रीव शिंदे, हनुमंत भालेकर, डॉ. तांबे साहेब, डॉ. गुरव साहेब इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ अजय घुगे, डॉ. अनिकेत सुतार, डॉ.विजय बोराडे, डॉ.दिपक चौरे, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, संदिप खोचरे, आशा कार्यकर्त्या उषा नरवडे व संजिवणी वडवराव यांनी परिश्रम घेतले.