धाराशिव (प्रतिनिधी)-गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाने वीर जवानांच्या साठी रक्षाबंधनाच्या सणानिमित्ताने राखी पाठवण्याच्या या शुभ कार्यास मंडळाच्या महिला विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात चांद्रयान 3 अलगदपणे दक्षिण ध्रुवावर उतरले मोहीम यशस्वी करण्यामध्ये इस्त्रोची सर्व शास्त्रज्ञ कर्मचारी यांचेही अभिनंदन मानाचा गणपती धाराशिव चा महाराजा यांच्या साक्षीने व्यासपीठावर हातामध्ये राष्ट्रध्वज घेऊन चांद्रयान प्रतिमा मंडळाच्या रंगमंचकावर ठेवून ,भारत माता की जय, वंदे मातरम, इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञानाचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया ,जय जवान -जय किसान ,तुळजाभवानी माते की जय, हो ,जय भवानी- जय शिवाजी अशा विविध घोषणाने व जय जयकाराने, ढोल ,ताशा ,हलगी या सर्व रणवाद्यांनी परिसर दुमदुमून गेला होता ,अभिनंदन व पुढील कार्याला शुभेच्छा ,मंडळाच्या सर्व पदाधिकारी गणेश दूत, गणेश भक्त, महिला भगिनीने पूजा विधि करण्यात आली. भारतीय संस्कृतीच्या सर्व उत्सवाच्या व सणाच्या निमित्ताने कौटुंबिक नात्याचे महत्व कायमचे जीवनामध्ये आपण सर्वांनी टिकवून ठेवले व वाढविले आहे .रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने आपण आपल्या कुटुंबामध्ये अत्यंत आनंदाने साजरे करत असतो .भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना मंडळाच्या वतीने ,स्वर्गीय हेमाताई देशपांडे व स्वर्गीय सरोजनी पाळणे यांच्या स्मरणार्थ मंडळातील राखीची पूजा “ मानाचा गणपती धाराशिवचा महाराजा व तुळजाभवानीमाता यांच्या समोर व्यासपीठावर या पूजा विधिने वीर जवानांना देश प्रेम, देशनिष्ठा व देश रक्षक म्हणून कार्य करताना व आपले कर्तव्य पार पाडताना या सर्व वीर जवानांना शक्ती, भक्ती, सामर्थ्य, हिम्मत,धाडस, जोश ,जोम, आनंद व प्रसन्नता प्राप्त व्हावी .यासाठी सर्वांनी मिळून श्री चरणी प्रार्थना करून राखी पाठविण्याचे कार्य केले आहे. यावेळी इस्ट्रोच्या शास्त्रज्ञांच्या चांद्रयान मोहीम यशस्वीतेसाठी, भारतीयांंना चंद्र भेट दिला याबद्दल महिलांनी या सर्वांना राख्या पाठवून रक्षाबंधनाची भेट मिळाली असे संदेश या जल्लोष कार्यक्रमात श्री चरणी प्रार्थना व्यक्त केली .यावेळी महिला युवती व मुली जास्त संख्येने हजर होती यामध्ये सौ. उज्वला दिवटे, निर्मला गवळी ,पाळणे, सुरेखा -नम्रता हुच्चे, जोशना कीती चव्हाण बामणे महामुनी इत्यादी या उपक्रमांची यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .यावेळी मंडळाचे कार्यवाह मनमत पाळणे, उपाध्यक्ष गजानन गवळी ,डॉ.अजित नायगावकर, काशिनाथ दिवटे, विश्वास दळवी, युवराज हुच्चे, बसवेश्वर पाळणे, अतुल ढोकार ,मुझे मिल पठाण, वरून साळुंखे ,मनोज अंजीखाने, अप्पा खरवरे, कुणाल दिवटे, विद्यासागर साखरे, संजय पाळणे व लेझीम मधील सर्व लहान थोर लेझीम पटू इत्यादी हजर होते व परिश्रम घेतले .यावेळी डॉ. नायगावकर यांनी चंद्र यान ची संपूर्ण थोडक्यात कार्यपद्धती विषयी मार्गदर्शन केले.प्रा. गवळी यांनी वीर जवानांच्या साठी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राख्या पाठवून त्यांच्या मनामध्ये वीर जवानांच्या मनामध्ये आपुलकीची व कौटुंबिक नात्याची वसुधैव कुटुंब याची जाणव आठवण व प्रेरणा ही मिळावी. याबद्दल त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी विविध वाद्यांचा आवाज व फटाक्यांच्या आतषबाजीने आपला जल्लोष आनंद ,अभिनंदन व्यक्त करण्यात आले ,या सर्व कार्यक्रमाचे संचलन प्रा भालचंद्र हुच्चे यांनी केले. आभार पाळणे यांनी केले.