धाराशिव (प्रतिनिधी) -प्रतिनिधी- खरीप 2022 मधील पीक विमा शेतकऱ्यांंना पंचनाम्यानुसार वाटप करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, सन 2022 मधील खरीप पीक विम्याची रक्कम विमा कंपनीने 3,16,428 शेतकऱ्यांना वाटप केलेली आहे. परंतू मिळालेला विमा असमान असून तो पंचनाम्यानुसार वाटप झालेला नाही. तो पंचनाम्यानुसार मिळणे अपेक्षीत आहे. विमा कंपनीने जिल्हा कृषी अधिकारी यांना पंचनामे देण्यास नकार दिलेला आहे. पंचनामे शासकीय रेकॉर्ड असून त्यावर कृषी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असताना पीक विमा कंपनी पीक पंचनामे उपलब्ध करुन देत नाहीत. कंपनीने वाटप केलेला पीक विमा पद्धत चुकीची असून समानतेने पंचनाम्यानुसार विमा वाटप झालेला नाही. विमा कपंनी कृषी अधिकारी यांना पंचनामे उपलब्ध करुन देत नसल्यामुळे विमा कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करुन शेतकऱ्यांना दहा दिवसात पीक विमा पंचनाम्यानुसार वाटप करावा, अन्यथा पीक विमा कंपनीच्या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय दुधगावकर यांनी दिला आहे.


 
Top