धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेमधून सहाय्यक राज्य कर आयुक्त वर्ग एक पदी निवड झालेल्या श्री अजित लोखंडे आणि टेक्सास विद्यापीठ अर्ली .आलिंगटन अमेरिका येथे भौतिकशास्त्र विषयात 27600 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 2282533 रु. इतकी स्कॉलरशिप मिळविणार्या सानिया यादगिर या दोन्ही माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख आणि महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा. श्री नानासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री अजित लोखंडे आणि कुमारी सानिया यादगिर यांच्या पालकांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी अजित लोखंडे आणि सानिया यादगिर या गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
यावेळी श्री नानासाहेब पाटील यांनी महाविद्यालयाच्या या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि असे विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडत आहेत ही खूप मोठी संपत्ती आहे असे ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ. एस.एस.फुलसागर यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. मारुती लोंढे यांनी केले तर आभार डॉ. कुणाल वणंजे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सहसमन्वयक प्रा. डॉ. संदीप देशमुख यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न.