धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील कळंब शहरात 22 फेब्रुवारी 2022 च्या मध्यरात्री 3 वाजता  ढोकी रोडवरील बॅक ऑफ इंडिया व हिताची कंपनीच्या एटीएम गॅस कटरने फोडून 2 एटीएम मशीनमधून 20 लाख 36 हजार रूपये चोरट्यांनी पळवले होते. एटीएम मशीनबाबत स्वॉफ्ट टार्गेट वाटणाऱ्या या सराईत गुन्हेगारांनी 30 ऑगस्ट 2023 रोजी 29 लाख 91 हजार 500 रूपयासह स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीनच पळवून नेली आहे. विशेष म्हणजे एटीएम मशीन चोरून नेणारे वाहन पोलिसांनी परभणी जिल्ह्यात पकडले असून, तीन पथक बीड व परभणी येथे चोरट्यांचा  शोध घेत आहेत अशी माहिती कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांनी पु. वि. लोकराज्य प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

कळंब शहरात बुधवारी पहाटे 3.30 वाजता चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. एटीएमला रोप वायरने बांधले ते वायर रस्त्यावर उभा असलेल्या वाहनाने ओढून एटीएमच अलगदपणे बाजूला केले आणि चोरटे एटीएम घेवून पसार झाले. विशेष म्हणजे ही चोरी फक्त तीन मिनिटात करण्यात आली आहे. या एटीएम मशीनमध्ये 29 लाख 91 हजार 500 रूपयांची रोकड होती. स्टेट बँक ऑफ इंडियाचे या ढोकी रस्त्यावर एटीएम मशीन आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर यापूर्वी दोन वेळेस एटीएम मशीन गॅस कटरने  फोडून पैसे पळवले आहेत. 

सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, पोलिस निरीक्षक सुरेश साबळे यांनी भेट दिली. घटनास्थळी ठसे तज्ञ पथक, श्वान पथक, फॉरेसिक पथक आधीने जावून बारकाईने पाहणी केली. 


 
Top