धाराशिव (प्रतिनिधी)-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील  रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी करण्यात आली. यामध्ये उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचा समावेश असून त्याच्या पुनर्विकासासाठी 21.72 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे नागरिकांशी संवाद साधला

उस्मानाबाद हे इतिहास आणि संस्कृती असलेले शहर आहे. प्राचीन किल्ले, मंदिरे आणि स्थापत्य रत्नांसह, उस्मानाबाद भूतकाळ आणि वर्तमानाचे एक मोहक मिश्रण आहे.

उस्मानाबाद येथील कार्यक्रमात विविध शाळेतील मुला मुलींनी नृत्य आणि पारंपरिक कार्यक्रम सादर केले. यावेळी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. मिलिंद पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे व निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य कार्यक्रमानंतर वेगवेगळ्या शाळेतील निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत यश प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्प,प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रेल्वे विद्युत अधिकारी अनुभव वर्षनेय यांनी केले. संचालन आणि उपस्थितांचे आभार आकाशवाणीचे निवेदक दौलत निपाणीकर यांनी मानले. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, रेल्वे प्रवासी, रेल्वे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top