तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा विद्यालयात दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. .                                               

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त  बाळासाहेब वाघ  होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी, तेरचे  उपसरपंच श्रीमंत फंड, जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन गोरोबा पाडुळे, पत्रकार नरहरी बडवे उपस्थित होते . याप्रसंगी तेरणा हायस्कूल तेरचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड यांनी इयत्ता दहावी व बारावी मधील

प्रथम 1 हजार रुपये, द्वितीय 750 रुपये, तृतीय  501 रुपये याप्रमाणे जाहीर केलेल्या बक्षिसांचे गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद यांचाही उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी  अच्युत हाजगुडे, नंदकुमार खोत, बिभीषण देठे, सूर्यकांत जाधव, रमेश लकापते, प्रदीप कोकाटे, दयानंद फंड,  सुवर्णा घुटे, संजीवनी भोसले, शरद सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार खोत यांनी केले व सूत्रसंचालन  नवनाथ पांचाळ यांनी केले.

 
Top