धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाच्यावतीने बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकी मध्ये सुखदेव सोजर वाघमारे रा. जवळा (दुमाले) ता. धाराशिव यांची धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ओव्हाळ, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष संपत सरवदे, कळंब शहराध्यक्ष जयपाल गायकवाड, जगदीश कार्लेकर, गौतम धावरे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.वाघमारे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


 
Top