परंडा (प्रतिनिधी)-महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्याच्या प्रतिमेला परंडा शिवसेनेच्या वतीने जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना परंडा तालुकाप्रमुख मेघराज पाटील, शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, युवासेना तालुकाप्रमुख शिवाजी देवकर, माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे, माजी उपनगराध्यक्ष ईस्माईल कुरेशी, दिपक गायकवाड, ईरफान शेख, अब्बास मुजावर, शंकर बप्पा जाधव, दिपक पाटील, जावेद बागवान, अनिल शिंदे, तौफीक मुजावर, कुनाल जाधव, तुषार गोफणे, अमोल गोडगे, अजिनाथ शेळके, बुध्दीवान गोडगे, अशोक खैरे आदीसह शिवसैनिक-युवासैनिक सहभागी होते.

राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षाकडूनही निषेध

कालपासून विविध वृत्तवाहिन्या व सोशल मिडियावरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या विषयी एक विचित्र दाखवले जात आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून सोमय्यांचा तीव्र शब्दात निषेध करते. राजकारणात नैतिकता जपणे आवश्यक आहे. त्यामुळे भाजपने किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी. भाजपमधील महिला बहिणी या प्रकरणी गप्प का आहेत? यांचे उत्तर द्यावे असे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मनिषा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 
Top