तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी पदी निलेश विश्वासराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यापुर्वी पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. 

तुळजापूर उपविभागीय पोलिस अधिकारीपदी सई भोर-पाटील यांची बदली झाल्याने एक महिन्यापासुन तुळजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी पद रिक्त होते. अखेर या पदावर निलेश विश्वासराव देशमुख यांच्या नियुक्तीचा आदेश सोमवार दि. 17 रोजी स्वप्नील  बोरसे अवर सचिव महाराष्ट्र शाषण यांच्या स्वाक्षरीने हे पदनियुक्ति आदेश काढण्यात आला. 

यापुर्वीच्या उपविभागीयपोलिसअधिकारी सई भोर पाटील कारकीर्द म्हणावी तशी  नव्हते. त्यामुळे उपविभागात अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला होता. नुतन उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख हे ग्रामीण भागातील अवैध धंदे रोखतील असा आशावाद नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

नुतन उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांच्या समोर रखडलेल्या निवडणुका, अवैध धंदे प्रतिबंध करणे, गणेशोत्सव व शारदीय नवराञोत्सव शांततेत पार पाडणे आव्हान असणार असुन ते कसे पेलणार यावर त्यांच्या कारकिर्दीचे मुल्यमापन होणार आहे.


 
Top