धाराशिव (प्रतिनिधी)-तालु्नयातील सांजा येथील श्रीराम देवस्थान कसबे तडवळे यांच्या मालकीच्या जमिनीवर या वर्षात अतिर्नित पीकविमा भरणा केल्याची तक्रार विक्रम रामभाऊ सुर्यवंशी आणि सांजा येथील इतर शेतकर्यांनी दिली होती. या प्रकरणाची चौकशी करून बीड येथील दोषी कॉमन सर्व्हिस सेंटरचे चालक संदिप चत्रभूज थोरात यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकर्यांनी दिलेल्य तक्रारीनुसार व विमा कंपनीकडील पीकविमा भरलेल्या यादीनुसार छाननी केली. दस्तऐवजावर संदीप चत्रभूज थोरात आणि प्रदिप चत्रभुज थोरात यांची नावे दिसून आली नाही. मात्र जिल्हा व्यवस्थापक, कॉमन सर्व्हिस सेंटर, जिल्हा बीड यांना सीएसपी आयडी क्रमांकावर भरलेल्या विमा नोंदणी तपासली असता बीड जिल्ह्यातील केज तालु्नयातील बनकरंजा येथील संदीप चत्रभुज थोरात यांच्या नावे असल्याचे कळले. थोरात यांना या कृषी कार्यालयाने नोटीस बजावून खुलासा प्राप्त केला. खुलाशात त्यांनी मी नवीन कॉमन सर्व्हिस सेंटर धारक असून, माझ्याकडून नजरचुकीने चुकीचे कागदपत्र व गट नंबरची निवड केल्याचे स्पष्ट केले. मात्र खरीप हंगाम 2022 मध्येही सांजा येथील श्रीराम देवस्थान कसबे तडवळा यांच्या मालकीच्या जमिनीवर विमा कंपनीकडून 15 हजार 255 रूपये विमा भरपाई जमा केल्याचे दिसले. संदीप थोरात आणि प्रदीप थोरात हे जाणीवपूर्वक सांजा येथील श्रीराम देवस्थान कसबे तडवळा यांच्या मालकीच्या जमिनीवर विमा भरून इतर शेतकर्यांची, शासनाची आणि विमा कंपनीची फसवणूक करत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आनंदनगर पोलिस ठाण्यात तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत थोरात सामुहिक सेवा केंद्रचालक बीड यांच्यावर फौजदारी गुन्हा दखल करण्यात आला आहे.