तुळजापूर -येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कोयता बाळगणा-या युवकास रविवार दि. 16 जुलै रोजी राञी 00.45 वा पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या बाबतीत अधिक माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कोयता बाळगुन महादेव बंडू क्षिरसागर, वय 20 वर्षे, रा. मातंगनगर, तुळजापूर हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे अंदाजे एक चार इंच लांबीची मुठ असलेला कोयता हा बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगून असताना पथकास आढळला. यावर पथकाने महादेव यास ताब्यात घेउन त्यांच्या जवळील ती कोयता जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 अन्वये तुळजापूर पो.ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.