धाराशिव (प्रतिनिधी)-लातूर ते मुरुड अकोला सुमारे वीस किमीचा रस्ता झाला असून पुढे मुरुड अकोला ते टेम्भुर्णी हे दीडशे किलोमीटरचे अंतर खराब रस्त्यामुळे या रस्त्यावर दीडशे किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे साडेसहा तास एवढा वेळ लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाता बरोबर चोर्यांचे प्रमाणांत मोठी वाढही झाली आहे. विशेष म्हणजे हे रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालय सोलापूर यांच्याकडे आहे. गेल्या दोन महिन्यापासून या रस्त्यावरील ट्रॉफिक सर्व्हेचे काम अद्यापही चालूच आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार हे सांगता येत नाही असे संबंधित अधिकार्यांने सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हा लातूर-टेभुर्णी रस्ता लातूर, धाराशिव, सोलापूर या तीन जिल्ह्यातून जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचा बोलबालाच चालू असून काम मात्र काहीच दिसत नसून या खराब व अरुंद रस्त्यामुळे अनेक वाहनांची वाहतूक औसा- तुळजापूर-सोलापूर मार्गे पुणे चालू झाल्याने प्रवाशी व व्यापारी यांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यांवरील खड्डे अनेक वेळा नागरिकांनी व ढोकी पोलिसांनी बुजवले होते. तसेच या रस्त्यावर तीन जिल्हे येतात. यामध्ये तीन खासदार, पाच आमदार असून याकडे लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
धाराशिव व शेजारी जिल्हातून गेलेले रस्ते कमी वाहतुकीची मार्ग असून देखील हे रस्ते मोठें करण्यात आले आहेत. लातूर ते टेभुर्णी या रस्त्यावर तासाला शेकडो अवजड वाहने, लहान वाहने वाहतात. यामध्ये मालवाहतूक वाहन, बस, लक्झरी, चारचाकी वाहने, ऊस वाहून नेणारे वाहने, शेतकरी यांचा माल घेऊन जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात असून ही गोष्ट संबंधित शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीनां कसे दिसत नसतील हे आश्चर्य आहे.
ट्रॉफिक सर्व्हेचे काम सुरू
लातूर-टेभुर्णी या चारपदरी रस्त्याच्या कामासाठी कंन्सलटींगची नियु्नती केली असून, डीपीआर झाला आहे. सध्या ट्रॉफिक सर्व्हेचे काम सुरू आहे. त्यानंतर किती लातूर-टेभुर्णी रस्त्याचे काम सुरू होण्यास किती महिने लागतील हे सांगता येत नाही.
सदाशिव शेळके, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग पी डब्ल्यु डी