धाराशिव (प्रतिनिधी)-कॅश मोहरर पदावर कार्यरत असलेल्या पोलिस हवालदाराने 6 लाख 78 हजार रूपयाचा घपळा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दि. 29 जुलै रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोलिस हवालदार प्रविण गणपतराव तावशीकर येथील आनंदनगर पोलिस ठाण्यात कॅश मोहरर या पदावर कार्यरत होते. त्यांनी पदाचा गैरवापर करून पोलिस ठाणे आनंदनगर येथील पोलिस संरक्षण तसेच कोरोना काळातील केलेल्या दंडात्मक कारवाईमध्ये वसूल केलेल्या दंडनीय शुल्काच्या रक्कमेत घपळा केला. शासकीय किर्दवर कुठेही या रक्कमेची नोंद घेतली नाही. शासन खात्यावर या र्नकमेचा चलनाद्वारे भरना केला नाही. दंडनीय शुल्काच्या रक्कमेत एकूण 6 लाख 78 हजार 364 रूपयाचा घपळा करून त्यांनी ही र्नकम स्वत: च्या फायद्यासाठी वापरली. हवालदार तावशीकर यांनी शासकीय रक्कमेचा अपहार करून फसवणूक केली अशी फिर्याद सहायक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ खरड यांनी आंनदनगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार हवालदार तावशीकर यांच्या विरूध्द फसवणूक व अपहाराच्या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 
Top