धाराशिव (प्रतिनिधी) - पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यासाठी वृक्ष लागवड करून त्या वृक्षांचे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. पर्यावरणाविना नैसर्गिक समतोल बिघडून त्याचा सृष्टीवर थेट विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांवर काहीजणांनी खिळे ठोकून लावलेले फलक पाहायला मिळत आहेत. ते फलक तात्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी द रुपामाता फाउंडेशनच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की, धाराशिव शहरातील झाडांवर खिळे ठोकून जाहिरात फलक लावलेले आहेत. त्यामुळे झाडांमधून अन्न आणि पाणी प्रवाहित होण्याच्या भागाला नुकसान पोहचते. तसेच शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी झाडांची भूमिका महत्वाची आहे. तसेच झाडावर जाहिराती

लावणे हा  The Maharashtra (Urban Areas) Protection and Preservation Of Tree Act 1975  नुसार गुन्हा आहे. तर जागतिक निसर्ग संवर्धन दिन सप्ताहाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून व कर्तव्य भावनेतून वृक्षांना फलक मुक्त करावे, अशी मागणी रुपाममाता फाऊंडेशनचे संस्थापक अॅड. अजित व्यंकटराव गुंड यांनी केले आहे.

 
Top