तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील कामठा गावच्या शेतमजुराचा मुलगा सुरज सुरेश जमदाडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन घेण्यात आलेल्या ग्रुप सी 2021 कर सहाय्यकच्या परिक्षेमध्ये ओपनमधुन 25 वी रँक मिळवत उतीर्ण होऊन टँक्स असिस्टंट आणि क्लार्क सहाय्यक व कर सहायक मंत्रालय लिपिक पदी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
सुरजच्या वडीलांना कामठा गावात आठ गुंठेच्या आत जमिन असुन त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. सुरजच्या आई-वडिलांनी शेतमजुर म्हणून का करुन पोराला शिकवले. याचे त्याने टँक्स असिस्टंट आणि क्लार्क सहाय्यक व कर सहायक मंत्रालय लिपिक पदी निवड झाली. या निवडीबद्दल ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना वतीने त्याचा सत्कार करुन अभिनंदन केले जात आहे.