तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरासह परिसरास शुक्रवार सांयकाळी मुसळधार पावसाने झोडपुन काढले.पावसाळ्यातील आजपर्यतचा हा सर्वात मोठा पाऊस ठरला. गेली दोन ते तीन दिवसापासून असाह्य उकाडा जाणवत होता. अखेर शुक्रवार सांयकाळी साडेपाच वाजता मुसळधार पावसास सुरुवात झाली.तो मुक्तपणे साडेसहा वाजेपर्यत बरसला. या झालेल्या पावसामुळे नुकत्याच उगवलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले असुन रखडलेल्या पेरण्या पुन्हा सुरुवात होणार आहेत. या झालेल्या पावसामुळे शहरात सखल भागात पाणीच पाणी झाले. नाल्या पावसाचा पाण्याने प्रथमच भरभरून वाहिल्या.

या झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 
Top