धाराशिव (प्रतिनिधी)-डीएड, बीएड. पदवी घेतलेल्या युवकांचा रोजगार हिरावून घेणार्‍या धोरणाचा एकल मंचने विरोध केला आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन चालू असताना देखील जि.प. शाळेमध्ये कंत्राटी पध्दतीने सेवानिवृत्त शिक्षकांची नियु्नती देण्याचा निर्णय नु्नताच घेण्यात आला आहे. या निर्णयाला आमचा स्नत विरोध अशा प्रकाराचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे अशी माहिती एकल मंचचे अध्यक्ष पवन सुर्यवंशी यांनी दिली.

मागील आठवड्यात शिक्षक भरती होईपर्यंत सेवांवर्त शिक्षकांना वीस हजार रुपयेच्या मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयास आमचा महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंच चा विरोध आहे. 

कारण सध्या राज्यामध्ये डीएड व बीएड धारक असे अनेक बेरोजगार युवक उपलब्ध असताना सुद्धा सेवानिवृत्त शिक्षक की ज्यांना पेन्शन असताना सुद्धा नेमण्याचा जो निर्णय घेतला आहे. तो खरोखर अनाकलनीय आहे. वास्तविक पाहता 2017 सालीच नवीन भरतीवरील बंदी उठवून पण शासनाने अद्याप कोणतीही भरती केलेली नाही. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने तसेच नवीन भरती होईपर्यंत डीएड धारक किंवा बीएड धारक सुशिक्षित बेरोजगार युवकांना ही संधी मिळावी ही एकल शिक्षक सेवा मंचाची मागणी आहे. याबाबत आपण घेतलेल्या शासन निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी आमची मागणी आहे.


 
Top