तुळजापूर -   तुळजापूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्ये अंतर्गत हालचालीना वेग आला आहे. मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी काही आजी-माजी पदाधिकारी यांनी उपमुखमंञी अजित पवार गटात सामील झाल्याचे पञकार परिषद घेऊन जाहीर केल्याने तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी फुट पडल्याचे स्पष्ट झाले. 

तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत फुट पडल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या गटात गेल्याची घोषणा पञकार परिषद घेवुन गोकुळ शिंदे, भाई शेख, विजयकुमार सरडे, दिगंबर खराडे, मनोज माडजे यांनी केली आहे. विशेष म्हणजे  तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या बहुसंख्य पदाधिकारी यांनी शरद पवार गटाचा धाराशिव येथे झालेल्या बैठकीला हजेरी लावली.

तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जि. प. सदस्य महेंद्र धुरगुडे हे उपमुखमंञी अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत ते आपली भूमिका उपमुखमंञी अजित पवार चर्चा नंतर गुरुवारी स्पष्ट करण्याची शक्यता आहे. त्यांच्या सोबत आणखी काहीजण जात असल्याचे समजते. 


 
Top