धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग असुन वनराईचे प्रमाण कमी आहे. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात रुजू झाल्यापासून वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या संकल्पातुन त्यांनी आज पावेतो वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा पोलीस दल आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने महादेव टेकडी परिसर वरंवटी, तसेच घाटनांदुर, ईट डोंगरमाळावर 1500 वृक्ष लागवड करण्यात आली. 

त्यामध्ये वड, पिंपळ, लिंब, चिंच, सिताफल, गुलमोहर, पांगीरा, बांबू, बदाम, अशा समाज उपयोगी एकुण वीस प्रजातीची झाडे लावण्यात आली. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता नितीन भोसले, आर्ट ऑफ लिव्हिंग धाराशिवचे स्वंयसेवक, वाशी पोलीस स्टेशनचे प्रभारी राज ससाणे, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, वाशी पोलीस स्टेशनचे अमंलदार, तसेच वरवंटी, घाटनादुंर व ईट येथील सामाजिक कार्यकर्त्ये, गावातील ग्रामस्थ यांनी वृक्ष लागवड अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोदंविला.

 
Top