धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद आळणी येथे एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या ज्युनियर आय. ए. एस.,  ए. टी. एस व एन. एस. एस. परीक्षेत आळणी या शाळेच्या विद्यार्थी यांनी उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आळणीचे सरपंच प्रमोद वीर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य अक्षय कदम, ग्रामपंचायत सदस्य अनंत खोबरे हे होते. शाळेची गुणवत्ता वाढ बरोबरच शाळेत विविध शालेय उपक्रम राबविले जातात असे मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी प्रास्ताविक मधून सांगितले. 

यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.

1) ज्युनियर आय. ए. एस. कुमारी ईश्वरी गणेश निंबाळकर राज्यात 32 वी, कुमार पृथ्वीराज सचिन देशमुख राज्यात 52 वां, कुमार हर्षवर्धन हनुमंत लावांड राज्यात 78 वा.

2) राष्ट्रीय  प्रज्ञा शोध परीक्षा - कुमारी ईश्वरी गणेश निंबाळकर केंद्रात 5 वी., 

3) राज्य प्रज्ञा शोध परीक्षा A-वर्ग पहिला - वीर आदित्य धनंजय _केंद्रात 1 ला, राऊत स्वराज अण्णासाहेब _केंद्रात 2 रा. 

वर्ग दुसरा-निंबाळकर श्राद्ध गणेश जिल्ह्यात 2 री, वीर दिव्य धनंजय केंद्रात 3 री, कोरे शिवकुमार मधुकर केंद्रात 4 था. वर्ग तिसरा-तऊर प्राची चंद्रकांत केंद्रात 1ली, वर्ग चौथा- ईश्वरी गणेश निंबाळकर केंद्रात 1ली, पृथ्वीराज सचिन देशमुख केंद्रात 2 रा. वर्ग सहावा -किरदत्त रजनंदिनी अगतराव केंद्रात 1 ली. वर्ग सातवा- मानसी तानाजी वीर केंद्रात 1 ला. 

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे  प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा हस्ते गौरव करण्यात आला ,तसेच सदर विद्यार्थ्याना अध्यापन करणार्‍या सर्व शिक्षकांना पण सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविक मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती मते क्रांती यांनी केले. तर आभार श्रीमती डोंगरे वर्षा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.


 
Top