धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य स्तरावरील आरोग्य निर्देशांक मध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या धाराशिव जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाचा आरोग्य निर्देशांक मध्ये दुसरा नंबर आल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांचा रुग्ण कल्याण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यापुर्वीही आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आपल्या रुग्णालयास गौरविण्यात आले असुन डॉ राजाभाऊ गलांडे यांचे कौतुक झाले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्याचे राज्यपाल यांनी त्यांचा गौरव देखील केला आहे. या कार्यक्रमास रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ अब्दुल मजीद,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नैतिकता समिती सदस्य गणेश रानबा वाघमारे,दिपक पांढरे,प्रविण जगताप,वैद्यकीय अधिष्ठाता डॉ शिल्पा डोमकुंडेवार,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी लाकाळ,डॉ इस्माईल मुल्ला, डॉ कोटलवार,डॉ घाडगे,डॉ महेश पाटील, डॉ.महाजन, डॉ.स्नेहल मॅडम, डॉ पवार मॅडम सह परिचारिका,पत्रकार मुसाभाई सय्यद,श्रीकांत मटकिवाले, चव्हाण अन्य इतर उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेटरन सुमित्रा गोरे मॅडम यांनी केले तर आभार डॉ.महेश पाटील यांनी मानले.


 
Top