तुळजापूर (प्रतिनिधी)-आज मसला (खुर्द) ग्रामपंचायत तर्फे स्वागत स्त्री जन्माचे या योजनेअंतर्गत गावातील ज्या घरामध्ये मुलीचा जन्म झाला आहे. त्या घरामध्ये पाच फळाच्या झाडाची रोप लावण्या साठी वाटप करण्यात आली आहेत.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य दयानंद शिंदे ग्रामसेवक कंदे, सरपंच रामेश्वर वैद्य, उपसरपंच श्रीराम खराडे, समाजसेवक लक्ष्मण वडवराव, कुलकर्णी बाई, उषा नरवडे, गावातील लाभार्थी माता भगिनी उपस्थित होते.


 
Top